राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला धक्का, माजी मंत्र्याचा भाजपमध्ये प्रवेश !

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला धक्का, माजी मंत्र्याचा भाजपमध्ये प्रवेश !

जालना – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जोरदार धक्का बसला असुन माजी मंत्र्यानं आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी जालन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लक्ष्मण ढोबळे हे भाजपकडून सोलापुरातील लोकसभेच्या जागेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत ते काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढवतील असा अंदाज आहे.

जालना येथे आज भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, आशिष शेलार, बबनराव लोणीकर हे नेते उपस्थितीत होते.

दरम्यान गेली काही दिवसांपासून ढोबळे भाजप नेत्यांच्या संपर्कात होते. त्यामुळे ते निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती. आज अखेर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते 2009 मध्ये सोलापुरातील मोहोळ-मंगळवेढा मतदारसंघातून विधानसभेचे आमदार होते. त्यांच्याकडे पाणीपुरवठा मंत्रालयाची जबाबदारी होती.

COMMENTS