राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा अनेक नगरसेवकांसह एमआयएममध्ये प्रवेश!

राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा अनेक नगरसेवकांसह एमआयएममध्ये प्रवेश!

मालेगाव – राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदारानं आज एमआयएममध्ये प्रवेश केला आहे. मालेगावातील माजी आमदार मुफ्ती इस्माईल यांनी आज एमआयएममध्ये प्रवेश केला आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रमुख उपस्थितीत इस्माईल यांनी प्रवेश केला आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी जवळपास निश्चित आहेत. त्यामुळे मालेगावमधील जागा काँग्रेसचे आमदार आसिफ शेख यांच्या वाट्याला जाणार आहे. त्यामुळे मुफ्ती यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली असल्याची माहिती आहे.

दरम्यान मुफ्ती इस्माईल यांनी मालेगाव महागटबंधनाच्या 20 नगरसेवक आणि समर्थकांसह एमआयएममध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे याठिकाणी मुफ्ती इस्माईल यांची ताकद वाढली असून राष्ट्रवादीला मात्र मोठा धक्का बसला असल्याचं दिसत आहे. तसेच मुफ्ती इस्माईल हे आगामी विधानसभा निवडणूक एमआयएमच्या तिकीटावर लढणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

COMMENTS