कोकणातील राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश!

कोकणातील राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश!

रायगड – विधानसभा निवड‌णुकीच्या तोंडावर
राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का बसला असून विद्यमान जिल्हाध्यक्ष आणि सुनिल तटकरेंचे कट्टर समर्थक प्रमोद घोसाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः घोसाळकर यांच्या हातात शिवबंधन बांधून त्यांचं शिवसेनेत स्वागत केलं आहे. यावेळी म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, दादा भुसे, अर्जुन खोतकर उपस्थित होते.

दरम्यान राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांचे पुतण्या आणि श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे हे देखील शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच आमदार अवधूत तटकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते लवकरच शिवसेनेत जाणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच राष्ट्रवादीच्या प्रमोद घोसाळकरांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

COMMENTS