शरद पवारांचे विश्वासू असलेल्या ‘या’ नेत्यानं दिला आमदारकीचा राजीनामा?

शरद पवारांचे विश्वासू असलेल्या ‘या’ नेत्यानं दिला आमदारकीचा राजीनामा?

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का बसला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे विश्वासू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कळंब-उस्मानाबादचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याची शक्यता वर्ततवली जात आहे. कारण राणा जगजितसिंह पाटील यांनी ईदनिमित्त केलेल्या फेसबुक पोस्टमुळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

https://m.facebook.com/ranajagjitsinhapatil/

दरम्यान राणा जगजितसिंह पाटील यांनी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत, मात्र फेसबुकवर शुभेच्छा पोस्ट करताना त्यांनी आपल्या नावासमोरील ‘आमदार’ शब्द हटवला आहे. तसेच या पोस्टरवर पक्षातयचं चिन्ह देखील दिसत नाही. त्यामुळे राणा जगजितसिंह पाटील यांनी राजीनामा दिली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जगजितसिंह पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगत आहे. राणा जगजितसिंह पाटील यांनी जर भाजपात प्रवेश केला तर आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा आहे.

COMMENTS