त्यामुळे कार्यक्रमादरम्यान कामगारांवर चिडले शरद पवार !

त्यामुळे कार्यक्रमादरम्यान कामगारांवर चिडले शरद पवार !

पुणे – पुण्यातील तळेगाव येथील कामगार नेते शरद राव यांच्या अर्ध पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याचा कार्यक्रम आज पार पडला. हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. या परंतु या कार्यक्रमादरम्यान शरद पवार हे पुरते वैतागले असल्याचं पहावयास मिळालं. मंचावर स्वागत करायला येणाऱ्या उत्साही कार्यकर्त्यांना अक्षरशः शरद पवारांनी खाली उतरवलं, मंचावर आणि समोर विनाकारण उभे असणाऱ्यांना बाजूला केलं तर गोंधळ घालणाऱ्यांना शांत केलं.

दरम्यान यावेळी शरद पवार यांनी कामगार चळवळ आणि पुरमोगामी विचारांवर आघात करणारी प्रवृत्ती सध्या सत्तेत असल्याची टीका केली. तसेच जुन्या कामगार नेत्यांमुळे कामगार संघटना बळकट आहेत. मात्र आता खूप संघटना नाहीत. कामगार संघटना मजबूत होऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक व्यासपीठ असले पाहिजे असे आत्ताच्या राज्यकर्त्यांना वाटत नाही. त्यामुळे कामगारांच्या समस्या वाढल्या असल्याचा दावाही यावेळी शरद पवार यांनी केला.

 

COMMENTS