राष्ट्रवादीच्या नेत्याची निवडणुकीतून माघार, भाजपला दिला पाठिंबा!

राष्ट्रवादीच्या नेत्याची निवडणुकीतून माघार, भाजपला दिला पाठिंबा!

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला ऐन विधाससभा निवडणुकीच्या तोंडावर पुणे जिल्ह्यात धक्का बसला असून राष्ट्रवादीचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. तसेच त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. प्रदीप कंद यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन भाजपचे उमेदवार बाबुराव पाचार्णे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी भाजपला पाठिंबा दिल्यामुळे शिरूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक पवार यांना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान प्रदीप कंद यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. महाराष्ट्रात देवेंद फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार येण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी आपण पाठिंबा देत आहोत. शिरूरमधून भाजपाचे उमेदवार बाबूराव पाचार्णे यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करण्यासाठी आपण संपूर्ण ताकद पणाला लावणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS