छगन भुजबळांना धक्का, ‘या’ समर्थकाचा शिवसेना उमेदवाराला पाठिंबा!

छगन भुजबळांना धक्का, ‘या’ समर्थकाचा शिवसेना उमेदवाराला पाठिंबा!

नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मोठा धक्का बसला आहे. भुजबळ यांचे खंदे समर्थक माणिकराव शिंदे यांनी शिवसेनेचे उमेदवार संभाजी पवार यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. परंतु येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघात भुजबळ यांचा मोठा जनसंपर्क आहे. त्यांनी या मतदारसंघातील अनेक विकास कामांचं लोकार्पण केलं आहे.

दरम्यान माणिकराव शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील भुजबळांविरोधात दंड थोपटले आहेत. ते स्वतः भुजबळांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये 3 जाहीर सभा घेणार आहेत. त्यामुळे भुजबळांना मोठं आव्हान असणार आहे. हे आव्हान भुजबळ कसं पेलवणार ते पाहण गरजेचं आहे.

COMMENTS