ब्रेकिंग न्यूज – राष्ट्रवादीचे नेते तारीक अन्वर अत्यवस्थ, तातडीने दिल्लीला हलवले !

ब्रेकिंग न्यूज – राष्ट्रवादीचे नेते तारीक अन्वर अत्यवस्थ, तातडीने दिल्लीला हलवले !

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे लोकसभेतील गटनेते तारीक अन्वर यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने दिल्लीला हलवण्यात आले आहे. सोमवारी त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यामुळे त्यांना तातडीने स्थानिक खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती सुधारली तर नाहीच उलट अधिक बिघडली. त्यामुळे आज त्यांना तातडीने एअर अब्युलन्सने दिल्लीला हलवण्यात आले आहे.

तारिक अन्वर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत.  शरद पवार यांच्यासोबत पी ए संगमा आणि तारिक अन्वर हे काँग्रेसबाहेर पडले होते. त्यावरी राष्ट्रवादी काँग्रेसचे ते संस्थापकांपैकी एक आहेत. बिहारमधील कटिहार मतदारसंघातून ते निवडूण आले आहेत.

COMMENTS