राष्ट्रवादीला मोठं खिंडार, ‘हा’ बडा नेता थोड्याच वेळात करणार शिवसेनेत प्रवेश ?

राष्ट्रवादीला मोठं खिंडार, ‘हा’ बडा नेता थोड्याच वेळात करणार शिवसेनेत प्रवेश ?

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण राष्ट्रवादीचे सचिन अहिर हे आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर तो राष्ट्रवादीसाठी सर्वात मोठा धक्का ठरणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अहिर यांना रोखण्यासाठी प्रयत्न केले होते मात्र ते अयशस्वी ठरल्याचे दिसते आहे. आज सकाळी ११ वाजता सचिन अहिर शिवसेनेत प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वीच सचिन अहिर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. मला तुमची कायम साथ लाभली आहे अशीच साथ पुढे कायम ठेवा. यापुढे आपल्याला अधिक ताकदीने लढायचे आहे असे म्हणत सचिन अहिर यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केले होते. तसेच काल त्यांच्या स्वीय सचिवांनी सगळ्या कार्यकर्त्यांना आज सकाळी अकरा वाजता मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थांनी हजर राहण्याचे आदेश दिले असल्याची माहिती आहे. त्यामुळे थोड्याच वेळात अहिर शिवसेनेत प्रवेश करतील अशी माहिती आहे.

COMMENTS