राष्ट्रवादीला तिसरा मोठा धक्का, ‘हा’ नेता अनेक नगरसेवकांसह करणार भाजपात प्रवेश?

राष्ट्रवादीला तिसरा मोठा धक्का, ‘हा’ नेता अनेक नगरसेवकांसह करणार भाजपात प्रवेश?

मुंबई – काही दिवसांपूर्वीच सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघही भाजपाच्या वाटेवर आहेत. वाघ यांनी राजीनामा दिला असून त्या 30 तारखेला भाजपात प्रवेश करतील असं बोललं जात आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीला तिसरा मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशी ओळख असलेले गणेश नाईक भाजपाच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५२ नगरसेवकांसह गणेश नाईक भाजपात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत नवी मुंबईचे महापौर सागर नाईक यांनी त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५२ नगरसेवकांची बैठकही बोलावली आहे. या बैठकीत भाजपा प्रवेशाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे नाईक यांनी भाजपात प्रवेश केला तर राष्ट्रवादीला हा आणखी एक मोठा धक्का ठरणार असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS