राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का, ‘हा’ नेता उद्या करणार भाजपात प्रवेश?

राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का, ‘हा’ नेता उद्या करणार भाजपात प्रवेश?

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील गळती सुरूच असल्याचं दिसत आहे. कारण उस्मानाबादचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राणाजगजितसिंह पाटील उद्या भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादी-काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी शिवसेना भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अडचणी वाढत असल्याचं दिसत आहे. तर भाजप –शिवसेना युतीची ताकद मात्र वाढत असल्याचं दिसत आहे.

दरम्यान उस्मानाबादमधील राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून राणाजगजितसिंह पाटील हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. परंतु राणाजगजितसिंह पाटील यांच्या पक्षांतराला उस्मानाबादच्या स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश रखडला होता. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनही राणाजगजितसिंह पाटील कोणतेही पक्षांतर करणार नसल्याचा दावा केला जात होता. परंतु त्यांचा हा दावा आता फोल ठरला असून राणाजगजितसिंह पाटील हे उद्या भाजपात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS