राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता जाणार भाजपमध्ये, ‘या’ तीन मतदारसंघाची केली मागणी?

राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता जाणार भाजपमध्ये, ‘या’ तीन मतदारसंघाची केली मागणी?

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण शरद पवार यांचे विश्वासू असलेले रामराजे निंबाळकर हे राष्ट्रवादीला रामराम करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादीत उदयनराजे यांच्या शब्दाला मान दिला जात असल्याने रामराजे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आमदार शिवेंद्र राजे भोसले यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर आता रामराजे यांनीही भाजपात जाण्याची सर्व तयारी केली असल्याचं दिसत आहे. त्यामुळे साताय्रात भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे

दरम्यान रामराजे यांनी भाजपकडे कुलाबा, फलटण आणि वाई या विधानसभा मतदारसंघाची मागणी केली असल्याची माहिती आहे. रामराजे यांना कुलाबा हा मतदारसंघ त्यांचे जावई व राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार राहूल नार्वेकर यांच्यासाठी हवा आहे. तर वाई विधानसभा हा त्यांना स्वत:साठी हवा आहे. तसेच कुलाब्याशिवाय फलटण या मतदारसंघाची मागणीही त्यांनी केली असल्याची माहिती आहे. त्यामुळे रामराजे यांची मागणी भाजप मान्य करणार का हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS