राष्ट्रवादीला धक्का, ‘या’ नेत्याचा भाजप प्रवेश निश्चित ?

राष्ट्रवादीला धक्का, ‘या’ नेत्याचा भाजप प्रवेश निश्चित ?

मुंबई  – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. सोलापूरमधील सांगोला येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते चेतनसिंह उर्फ बाळासाहेब केदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. चेतनसिंह हे विद्यमान नगरसेवक आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आहेत. माजी उपनगराधक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. त्यामुळे चेतनसिंह यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीचं सांगोला तालुक्यात मोठं नुकसान होणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक आमदार येत्या आठवड्याभरात राजीनामा देणार असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या गौप्यस्फोटानंतर चेतनसिंह यांच्या रुपाने राष्ट्रवादीला हा पहिला धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे. ते पंढरपूरमध्ये होणाऱ्या भाजप मेळाव्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

COMMENTS