राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता आज शिवसेनेत प्रवेश करणार?

राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता आज शिवसेनेत प्रवेश करणार?

बुलढाणा – विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. परंतु तरीही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील गळती अजून सुरुच असल्याचं दिसत आहे. बुलढाण्यातील डॉ राजेंद्र शिंगणे यांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ रामप्रसाद शेळके आज मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हक्काच्या सिंदखेडराजा मतदारसंघात राजकीय उलथापालथ झाली असून बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रवादीला गळती लागली आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील अनेक नेत्यांनी शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दोन दिवसांपूर्वीच साताय्रातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे साताय्रात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर आता बुलढाण्यातही राष्ट्रवादीमध्ये गळती सुरु झाली असल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ रामप्रसाद शेळके आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे याठिकाणी राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS