राष्ट्रवादीला मोठा धक्का, ‘हा’ बडा नेता करणार शिवसेनेत प्रवेश ?

राष्ट्रवादीला मोठा धक्का, ‘हा’ बडा नेता करणार शिवसेनेत प्रवेश ?

बीड – उद्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निकालाकडे देशाचं लक्ष लागलं आहे. परंतु अशातच राज्यातील राष्ट्रवादीचा नेता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे बीड जिल्ह्यातील महत्वाचे नेते आणि गेली काही दिवसांपासून पक्षावर नाराज असलेल्या जयदत्त क्षीरसागर यांनी पक्षाला रामराम करत शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे. त्यामुळे ते आज शिनबंधनात अडकतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान बीड, धारूर, माजलगाव आणि शिरूर तालुक्यात जयदत्त क्षीरसागर यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात असून लोकसभा निवडणुकीत क्षीरसागर यांनी भाजपच्या उमेदवार प्रितम मुंडे यांना जाहीर पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. परंतु आज ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

जयदत्त क्षीरसागर यांची राजकीय पार्श्वभूमी

बीडमधून तीन वेळा खासदार राहिलेल्या केसरबाई क्षीरसागर यांचे चिरंजीव जयदत्त क्षीरसागर हे काँग्रेसमध्ये होते.

त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत ते राष्ट्रवादीत गेले

राष्ट्रवादीत एक ओबीसी चेहरा आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तोडीस तोड म्हणून राष्ट्रवादीने त्यांना मंत्री मंडळात अनेकदा संधी दिली.

 देशासह राज्यात भाजपची लाट सुरू असताना बीड जिल्ह्यातून ते राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक विजयी झाले होते.

जिल्ह्यात दमदार यंत्रणा असणारे नेते म्हणून त्यांची ओळख

 जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे सर्वात जास्त शिक्षण संस्था

 बीड, धारूर, माजलगाव आणि शिरूर तालुक्यात जयदत्त क्षीरसागर यांचा मोठा प्रभाव

सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती, बीड नगरपालिका, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्था क्षीरसागर यांच्या ताब्यात

 

 

COMMENTS