राष्ट्रवादीला धक्का, ‘हा’ ज्येष्ठ नेता शिवसेनेच्या वाटेवर ?

राष्ट्रवादीला धक्का, ‘हा’ ज्येष्ठ नेता शिवसेनेच्या वाटेवर ?

सातारा – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीमधील अनेक नेते भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. अशातच पश्चिम महाराष्ट्रातील वजनदार नेते अशी ओळख असलेले रामराजे नाईक निंबाळकर हेदेखील राष्ट्रवादीत नाराज असल्याचं दिसत आहे. त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. साताऱ्यात रामराजे आणि उदयनराजे यांचा गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. अशातच या दोन्ही नेत्यांमधील संघर्ष आणखी वाढला आहे. त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील असं बोललं जात आहे.

दरम्यान कोणी कोणाचे पाणी पळविलेले नाही, रामराजेंनी पाण्याबाबत कधीही राजकारण केलेले नाही. मात्र, आमचे स्वयंघोषित छत्रपती खासदार उदयनराजे भोसले काही चक्रमांना घेऊन भलते सलते आरोप करीत आहेत त्यांना आवरा नाहीतर पक्षातून बाहेर पडू,’ असा इशारा रामराजे नाईक निबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला दिला होता.

त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रामराजे आणि उदयनराजे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र शरद पवारांच्या या प्रयत्नांना यश आलं नाही. कारण या दोघांमधील वाद मिटवण्यासाठी पवारांनी घेतलेल्या बैठकीनंतर रामराजे आणि उदयनराजे यांनी एकमेकांवर टीकेचे आसूड ओढले आहेत. त्यामुळे आता निंबाळकर हे शिवसेनेत जातील अशी चर्चा आहे.

COMMENTS