राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार शिवसेनेत जाणार, आजच्या बैठकीला दांडी?

राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार शिवसेनेत जाणार, आजच्या बैठकीला दांडी?

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातील नेत्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक
बोलावली आहे. या बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थिती तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर चर्चा होण्याची शक्यता असून ईव्हीएम विरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढला जाणार आहे, त्याबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीला राज्यातील पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी आजच्या बैठकीला दांडी मारली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलीप सोपल हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. दिलीप सोपल यांनी आज पक्षाच्या मुंबईतील बैठकीला दांडी मारून आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यानंतर ते आपला राजकीय निर्णय जाहीर करणार आहेत. त्यामुळे आता सोपल हे आपला निर्णय लवकरच जाहीर करणार असल्याचं द्सत आहे.

COMMENTS