दोन दिवसात राष्ट्रवादीचा आणखी एक नेता शिवसेनेत प्रवेश करणार?

दोन दिवसात राष्ट्रवादीचा आणखी एक नेता शिवसेनेत प्रवेश करणार?

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण विदर्भातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित दोन दिवसात समीर देशमुख यांचा मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. समीर देशमुख हे सहकार महर्षी आणि माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव आहेत. प्रा. सुरेश देशमुख हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांचा मुलगाच आता राष्ट्रवादीला सोडणार असल्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार भास्कर जाधव 13 सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर भास्कर जाधव यांचा पक्षप्रवेश होणार आहे. भास्कर जाधव यांच्यासोबत शेकडो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनेत जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार आहे.

COMMENTS