राष्ट्रवादीच्या ‘या’ दोन ज्येष्ठ नेत्यांचा लोकसभा निवडणूक लढण्यास नकार !

राष्ट्रवादीच्या ‘या’ दोन ज्येष्ठ नेत्यांचा लोकसभा निवडणूक लढण्यास नकार !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये नाशिकमधून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर ठाण्यातून गणेश नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु या दोन्ही नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिला असल्याची माहिती आहे.

दरम्यान या दोन्ही नेत्यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह पक्षाने धरला आहे. परंतु हे दोन्ही नेते निवडणूक लढवण्यास इच्छूक नाहीत. ठाण्यातून आपला मुलगा संजीव नाईक यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी गणेश नाईक यांनी पक्षाकडे केली आहे. तर छगन भुजबळ यांनी नाशिकमधून आपले पुतणे समीर भुजबळ यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी पक्षाकडे केली आहे. त्यामुळे आता याबाबत पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS