आघाडीने अमरावतीची जागा रवी राणांना सोडली, राष्ट्रवादी काँग्रेस खरंच लोकसभा निवडणूक गांभीर्याने लढत आहे का ?

आघाडीने अमरावतीची जागा रवी राणांना सोडली, राष्ट्रवादी काँग्रेस खरंच लोकसभा निवडणूक गांभीर्याने लढत आहे का ?

मुंबई – केंद्रात भाजप विरोधी आघाडी करण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घेतलेला आहे. त्यासाठी त्यांनी दिल्लीत जोर बैठकाही घेतल्या. मात्र राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची निवडुकीची रणनिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेस खरोखरच लोकसभा निवडणूक लढण्याबाबत गंभीर आहे का असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चीला जात आहे. अमरावतीची जागा राष्ट्रवादीनं रवी राणा यांच्या पत्नीसाठी सोडली आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी अमरवतीमधून लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढवली होती. मात्र पराभूत झाल्यानंतर त्या कधी राष्ट्रवादीसोबत राहिल्या नाहीत. रवी राणा यांची मुख्यमंत्र्यांसोबत चांगलीच जवळीक निर्माण झाली होती. रवी राणा आणि नवनीत राणा तोंडभरुन मुख्यमंत्र्यांचं कौतुक करत होते. एवढच नाही तर भाजप शिवसेना वेगवेगळे लढले तर नवनीत राणा या भाजपच्या उमेदवार असतील असंही बोललं जात होतं. मात्र युती झाली आणि सगळचं गणित बदललं.

गेली पाच वर्ष भाजपसोबत असलेले रवी राणा आणि नवनीत राणा हे आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आघाडीच्या वळचणीला आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस नवनीत राणा यांच्यासाठी जागा सोडत आहे. म्हणज्येच आघाडी नवनीत राणा यांना पाठिंबा देत आहेत. त्या काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या चिन्हावर नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरत आहेत. समजा उद्या नवनीत राणा निवडूण आल्या तरी त्या आघाडीसोबत राहतील याची काय गॅरंटी आहे ? त्यामुळे एकप्रकारे ही जागा राष्ट्रवादीने बाय दिली आहे की काय असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चीला जात आहे.

बीडच्या उमेदवारीबाबतही तीच स्थिती आहे. तिथेही गेली अनेक दिवस अमरसिंह पंडित लोकसभेची तयारी करत होते. ते डॉ. प्रीतम मुंडे यांना चांगली फाईट देतील अशीही चर्चा होती. मा तिथे राष्ट्रवीदीने चक्क पंडित यांना डावलून तुलनेत कमकुतव समजल्या जाणा-या बजरंग सोनावणे यांना उमेदवारी दिली आहे. तिथल्या स्थानिक नेत्यांनी आपलं विधानसभेचा फायदा पाहून सोनवणे यांना पुढं केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

ठाण्यात गणेश नाईक यांनी लोकसभा लढवायला नकार दिला. नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणूक लढवायला नकार दिला. शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतली. त्याचं कारण काहीही असो. पण राज्यात त्याचा मेसेच चुकीचा गेला आहे. जिंकून येण्याची खात्री नसल्यामुळे पवारांनी पळ काढला अशी चर्चा आहे. त्यामुळे एकदा लढायचा निर्णय घेऊन पुन्हा माघार घेतल्यामुळे खरचं राष्ट्रवादी लोकसभा निवडणुकीसाठी गंभीर आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. भाजपसाठी राष्ट्रवादी बाय तर देत नाही ना अशीही चर्चा आहे.

COMMENTS