भंडारा-गोंदियात राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदाराचा पत्ता कट, ‘यांना’ दिली उमेदवारी!

भंडारा-गोंदियात राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदाराचा पत्ता कट, ‘यांना’ दिली उमेदवारी!

भंडारा-गोंदिया – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीनं आपला उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना पंचबुद्धे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली असून विद्यमान खासदार मधुकर कुकडे यांचा पत्ता कट झाला आहे.नाना पंचबुद्धे हे भंडारा जिल्ह्यातील अर्जुनी गावातील रहिवासी असून याच क्षेत्रातून जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती. जिल्हापरिषद सदस्य ते आमदार असा नाना पंचबुद्धे यांचा प्रवास आहे.

दरम्यान भंडारा- गोंदियाचे खासदार नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे 28 मे रोजी पोटनिवडणुकीसाठी इथे मतदान झालं होतं. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत झाली होती. ज्यात राष्ट्रवादीच्या मधुकर कुकडे यांनी भाजपच्या हेमंत पटले यांचा पराभव केला होता.  परंतु आगामी निवडणुकीसाठी मात्र राष्ट्रवादीनं कुकडे याॆचं तिकीट कापलं आहे.

COMMENTS