खासदार बदला, जिल्हा बदलेल, राष्ट्रवादीच्या ‘त्या’ जाहिरातीची जोरदार चर्चा!

खासदार बदला, जिल्हा बदलेल, राष्ट्रवादीच्या ‘त्या’ जाहिरातीची जोरदार चर्चा!

परभणी – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेल्या जाहिरातीची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी ही जाहिरात केली आहे. यामध्ये बाबाजानी दुर्राणी यांनी वृत्तपत्रात नववर्षाच्या जाहिरात जनतेला खासदार बदलण्याचे आवाहन केलं आहे. ‘खासदार बदला, जिल्हा बदलेल… वेळ आहे परिवर्तनाची, गरज आहे विकासाची’ या मथळ्याखाली जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

दरम्यान परभणी जिल्ह्यात मागील 30 वर्षांपासून शिवसेनेचा खासदार निवडून येत आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अद्याप यश आलेलं नाही. त्यामुळे यंदा ही जागा कुठल्याही परिस्थतीत जिंकायची असा आदेश पक्षाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे  शिवसेनेने आजपर्यंत केवळ जातीय तेढच निर्माण केला असल्याचा आरोप त्यांनी या जाहिरातीत करण्यात आला आहे.

COMMENTS