ब्रेकिंग न्यूज – राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, पार्थ पवारांचे नाव नाही!

ब्रेकिंग न्यूज – राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, पार्थ पवारांचे नाव नाही!

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसने 10 उमेदवारांची पहिला यादी जाहीर केली आहे, मात्र शरद पवारांनी ज्या पार्थसाठी आपली उमेदवारी मागे घेतली त्या पार्थ पवार यांचे नाव पहिल्या यादीत नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

1) रायगड – सुनील तटकरे,

2) बारामती – सुप्रिया सुळे

3) सातारा – उदयनराजे भोसले

4) कोल्हापूर – धनंजय महाडिक

5) बुलढाणा – डॉ राजेंद्र शिंगणे

6) जळगाव – गुलाबराव देवकर

7) परभणी – राजेश वीटेकर

8) मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील

9) ठाणे – आनंद परांजपे

10). कल्याण – बाबाजी बाळाराम पाटील

11) लक्षद्वीप – महमंद फैजल

तसेच हातकणंगलेच्या जागेसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा दिला आहे. तसेच बीड, नगरची चर्चा झाली असून पुढील यादी उद्या जाहीर करण्यात येणार आहे.

COMMENTS