माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून ‘यांना’ उमेदवारी ?

माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून ‘यांना’ उमेदवारी ?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोणाला उमेदवारी देणार याकडे लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात संजय शिंदे यांनी माढ्यातून निवडणूक लढवावी यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील असल्याची माहिती आहे. त्यामुळे संजय शिंदे यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान संजय शिंदे यांच्याबरोबर माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांचं नावंही चर्चेत आहे. मात्र राष्ट्रवादीच्या माढ्यातील उमेदवारीचा निर्णय उद्या घेतला जाणार असून याबाबत शरद पवारांनी माढ्यातील स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. प्रत्येकाचं मत जाणून घेतल्यानंतर पवार उद्या उमेदवार निश्चित केला जाणार आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर माढ्यात तगडा उमेदवार देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. त्यामुळे याठिकाणी संजय शिंदे यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

COMMENTS