माढा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून ‘यांना’ उमेदवारी, उद्या होणार घोषणा !

माढा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून ‘यांना’ उमेदवारी, उद्या होणार घोषणा !

सोलापूर – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने माढ्याचा उमेदवार निश्चित केली असल्याची माहिती आहे. माढा मतदारसंघातून माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी दिली  असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज किंवा उद्या प्रभाकर देशमुख यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे.

दरम्यान प्रभाकर देशमुख यांच्या उमेदवारीची कुणकुण लागल्याने, मोहिते पाटील राष्ट्रवादीवर नाराज होते. त्यामुळेच विजयसिंह मोहिते पाटील यांनी खुद्द शरद पवारांना माढ्यातून निवडणूक लढण्याचा आग्रह केला होता. पवारांनीही आधी लढण्याची घोषणा केली, त्यानंतर त्यांनी माघार घेतली. परंतु पवारांनी माघार घेतल्यानंतरही रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली नाही त्यामुळे ते उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

COMMENTS