धुळे – राष्ट्रवादीला मोठा झटका, शहराध्यक्ष मनोज मोरेंनी दिला राजीनामा !

धुळे – राष्ट्रवादीला मोठा झटका, शहराध्यक्ष मनोज मोरेंनी दिला राजीनामा !

धुळे – धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा झटका बसला असून पक्षाचे शहराध्यक्ष मनोज मोरे यांनी आज राजीनामा आहे.दरम्यान मोरे यांनी राजनाम्याचे कारण मात्र नमुद केले नसल्यामुळे त्यांनी राजीनामा का दिला याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. तसेच मनोज मोरे हे मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ही आहेत. त्यामुळे त्यांया राजीनाम्याचे गुढ वाढले असल्याचं दिसत आहे.

दरम्यान काही लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे राज्यात राष्ट्रवादीसह सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. अशातच जिल्हाध्यक्ष असलेल्या मोरे यांनी राजीनामा दिला असल्यामुले पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे. तसेच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मनोज मोरे हे कोणत्या पक्षात जाणार याबाबतही राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे. परंतु याबाबत मनोज मोरे यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर हे स्पष्ट होणार आहे.

COMMENTS