मावळमध्ये भाजपला धक्का, ‘या’ नेत्याची राष्ट्रवादीत घरवापसी!

मावळमध्ये भाजपला धक्का, ‘या’ नेत्याची राष्ट्रवादीत घरवापसी!

पिंपरी -चिंचवड – मावळमध्ये भाजपला धक्का बसला असून निवडणुकीच्या तोंडावर माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ पुन्हा एकदा हातात घेतलं आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत ओव्हाळ यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. शेखर ओव्हाळ यांच्या घरवापसीमुळे मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीला धक्का बसला असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद आणखी वाढली आहे.

दरम्यान शेखर ओव्हाळ यांचा रावेत, पुनावळे येथे मोठा जनसंपर्क असून यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादीतच काम केलं आहे. परंतु 2017 मध्ये झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीदरम्यान त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेखर ओव्हाळ यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

COMMENTS