व्यंकय्या नायडूंविरोधात राष्ट्रवादी आक्रमक, जय भवानी, जय शिवाजी लिहून २० लाख पोस्ट कार्ड पाठवणार – मेहबूब शेख

मुंबई – राज्यसभेचा नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा बुधवारी पार पडला. यावेळी शपथ घेतल्यानंतर भाजपचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसलेंनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी…जय शिवाजी’ अशी घोषणा दिली होती. या घोषणेनंतर राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना समज दिला. ‘हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नाही, त्यामुळे पटलावर रेकॉर्ड होणार नाही. हा शपथविधी माझ्या दालनात होत आहे. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्य उदयनराजेंनी याबद्दल पुढे दक्षता घ्यावी’, अशी सूचनाही केली होती.

यावरुन आता शिवसेना, राष्ट्रवादीनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजप हा महाराष्ट्रद्वेषी असल्याचे स्पष्ट होत असून या घटनेचा निषेध म्हणून आम्ही व्यंकय्या नायडू यांना जय भवानी जय शिवाजी लिहल्याचे २० लाख पोस्ट कार्ड पाठवणार आहोत, असे मेहबूब शेख यांनी म्हटले आहे.

तसेच याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही भाजपवर ट्वीटरवरुन टीका केली आहे. छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे. तर संभाजी भिडे यांच्या कडून  सांगली सातारा बंदची अदयाप घोषणा नाही…

जय भवानी!

जय शिवाजी!!!!!!! असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

https://twitter.com/rautsanjay61/status/1286179266778943489?s=19

COMMENTS