राष्ट्रवादीचे मंत्री पक्ष कार्यालयात घेणार जनता दरबार !

राष्ट्रवादीचे मंत्री पक्ष कार्यालयात घेणार जनता दरबार !

मुंबई – राष्ट्रवादीचे मंत्री पक्ष कार्यालयात जनता दरबार घेणार आहेत. 31 ऑगस्टपासून मंत्री जनता दरबाराला सुरुवात करणार आहेत. याबाबत पक्षाने मंत्र्यांच्या जनता दरबाराचे वेळापत्रक ठरवले आहे. सोमवारी जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक तर मंगळवारी छगन भुजबळ, राजेंद्र शिंगणे, बाळासाहेब पाटील हे जनता दरबार घेणार आहेत.

तसेच बुधवारी अजित पवार, राजेश टोपे, दत्तात्रेय भरणे आणि प्राजक्त तनपुरे तर गुरुवारी हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील
आणि शुक्रवारी अनिल देशमुख, अदिती तटकरे, संजय बनसोडे हे जनता दरबार घेणार आहेत. यावेळी जनतेच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती आहे.

COMMENTS