शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदाराला अटक !

शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदाराला अटक !

अहमदनगर – पोटनिवडणुकीच्या निकालानंतर काल अहमदनगरमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये रक्तरंजित राडा झाला. यामध्ये दोन शिवसैनिकांचा मृत्यू झाला. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांना अटक करण्यात आली आहे. शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुण जगताप, संग्राम जगताप आणि भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचा हात असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांनी केला आहे.

काल रात्री संग्राम जगताप यांना चौकशीसाठी पोलिस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयात तोडफोड केली. दरम्यान अहमदनगरमध्ये तणावाचे वातावरण आहे. या प्रकरणी आतापर्यत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. हत्येच्या निषेधार्थ शिवसेनेने आज अहमदनगर शहर आणि जिल्हा बंदची हाक दिली आहे.

COMMENTS