राष्ट्रवादीला धक्का ‘या’ आमदाराचा अखेर शिवसेनेत प्रवेश!

राष्ट्रवादीला धक्का ‘या’ आमदाराचा अखेर शिवसेनेत प्रवेश!

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आणखी एक धक्का बसला असून श्रीवर्धन येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अवधूत तटकरे यांनी आज मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. दोन दिवसांपूर्वीच अवधूत तटकरे यांनी आपला आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी आदित्य ठाकरे यांचीही भेट घेतली होती. आज अखेर तटकरे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे श्रीवर्धनमध्ये शिवसेनेची मोठी ताकद वाढली आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि अवधूत तटकरे यांच्यात वाद असल्याचे बोलले जात आहे. सुनील तटकरे यांची मुलगी अदिती तटकरे आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अवधूत तटकरे हे नाराज होते. त्यावरुन त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीक अवधूत तटकरे विरुद्ध अदिती तटकरे असा भाऊ बहिणीचा सामना रंगणार असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS