शेतक-यांच्या जमिनीसाठी राष्ट्रवादीच्या आमदारांचं सावकाराच्या घरात घुसून आंदोलन !

शेतक-यांच्या जमिनीसाठी राष्ट्रवादीच्या आमदारांचं सावकाराच्या घरात घुसून आंदोलन !

यवतमाळ – सावकाराच्या ताब्यातून शेतक-यांच्या जमिनी सोडवण्यासाठी यवतमाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदारांनी आंदोलन केलं आहे.  सावकाराच्या घरात घुसुन शेतकऱ्यांच्या जमिनी मिळवुन देण्यासाठी आमदार विद्या चव्हाण आणि आमदार खाजा बेग हे शेतकऱ्यासह सावकाराच्या घरी धडकले होते. महागाव येथील संजय उर्फ अनंता नागरगोजे याच्यावर अवैध सावकारी करत शेतक-याच्या जमीनी बळकावल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं आक्रमक पवित्रा घेतला आहे.

शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याला अवैध सावकारांनी विळखा घातला आहे. सावकारांच्या जाचाने त्रस्त असलेले शेतकरी सरकारी अधिकाऱ्यांच्या लाचखोर प्रवृत्तीमुळे वैफल्यग्रस्त झाले असून इंग्रजांच्या राजवटीपेक्षा सरकारी यंत्रणा अधिक जाचक आहे. ही व्यवस्था शेतकऱ्यांच्या मुळावर उठली असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी केली आहे.

COMMENTS