राष्ट्रवादीच्या आमदाराला स्वाईन फ्लूची लागण !

राष्ट्रवादीच्या आमदाराला स्वाईन फ्लूची लागण !

नागपूर – राज्यात स्वाईन फ्लू या आजारानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. या आजारामुळे राज्यातील अनेक नागरिकांना आपला जीव गमावावा लागला आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार प्रकाश गजभिये यांना स्वाईन फ्लूची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. गजभिये यांच्यावर नागपुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

दरम्यान प्रकाश गजभिये हे 10 दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पुण्याला गेले होते. तेव्हापासून ते आजारी पडले होते. त्यानंतर डॉक्टांनी त्यांच्या तपासण्या केल्या असता प्रकाश गजभिये यांना स्वाईन फ्लू झाल्याचे निदान झाले आहे. सध्या गजभिये यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत.

COMMENTS