माझ्यावरील आरोप खोटे, सूनेचे विवाहबाह्य संबंध – विद्या चव्हाण

माझ्यावरील आरोप खोटे, सूनेचे विवाहबाह्य संबंध – विद्या चव्हाण

मुंबई – राष्ट्रवादीच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या सदस्या विद्या चव्हाण यांनी आपल्या सूनेने केलेल्या आरोपाचे खंडन केले आहे.
सूनेने केलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सूनेच्या मोबाईलमधील चॅट आणि अन्य काही बाबींवरून तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचं आमच्या निदर्शनास आलं. माझ्या मुलानं यासंदर्भातील सर्व पुरावे गोळा केले आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकाराची आम्हाला कल्पना दिली. त्यांनी घटस्फोटासाठी वकीलांशी संपर्कदेखील साधला होता. असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.

तसेच नवरा बायकोच्या वादात मला भोवण्यात आलं. दुसरी मुलगी झाली म्हणून करण्यात आलेले आरोप हे चुकीचे आहेत. आम्ही दुसऱ्या मुलीलाही तळाहाताच्या फोडाप्रमाणे जपलं असल्याचं त्या म्हणाल्यात.

दरम्यान विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूनेचा छळ केल्याप्रकरणी विद्या चव्हाण, त्यांचे पती अभिजित, मुलगा अजित, दुसरा मुलगा आनंद आणि त्यांची पत्नी शीतल यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात १६ जानेवारी रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. सूनेचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम ४९८ अ, ३५४, ३२३, ५०४, ५०६ आणि ३६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

COMMENTS