राष्ट्रवादीला धक्का, या आमदाराचा राजीनामा, उद्या शिवसेनेत प्रवेश करणार !

राष्ट्रवादीला धक्का, या आमदाराचा राजीनामा, उद्या शिवसेनेत प्रवेश करणार !

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जोरदार धक्का बसला असून राष्ट्रवादीचे शहापूरचे आमदार पांडुरंग  बरोरा यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मुंबईत विधानसभा अध्यक्षांना भेटून त्यांनी राजीनामा दिला असून
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत बरोरा यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली. त्यामुळे बरोरा हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच ते उद्या मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर आगामी निवडणुकीत शिवसेनेला मोठा फायदा होणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS