राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार शिवसेनेच्या वाटेवर?

राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार शिवसेनेच्या वाटेवर?

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला आणखी एक धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंचा पुतण्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं दिसत आहे.
‪राष्ट्रवादीचे श्रीवर्धन येथील आमदार अवधूत तटकरे हे थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आमदार अवधूत तटकरे यांचा लवकरच शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान सुनील तटकरे यांची मुलगी अदिती तटकरे आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अवधूत यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेली काही दिवसांपासून अवधूत तटकरे आणि सुनील तटकरे यांचे संबंध तणावाचे आहेत. याबाबत शरद पवार यांनी स्वतः तटकरे कुटुंबीयांच्या या भांडणात हस्तक्षेप करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. पण याला फारसं यश आलं नव्हतं. कारण 2016 ला अवधूत तटकरेंच्या छोट्या भावाने शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता त्यांनीही शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला हा मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS