राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्र्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल !

राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्र्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल !

बीड – राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे विद्यमान आमदार अमरसिंह पंडित आणि त्यांचे वडील माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. जिल्हा बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी अमरसिंह पंडित, शिवाजीराव पंडित यांच्यासह 28 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेवराई पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

अमरसिंह पंडित चेअरमन असलेल्या गढी येथील जयभवानी सहकारी साखर कारखान्याने बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून 14 कोटी रुपये कर्ज घेतले होते. या कर्जपोटी कारखान्याने बँकेला स्वतःची जमीन गहाणखत करून दिली होती. तीच जमीन बँकेच्या परस्पर कारखाण्याने विक्री केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी बँकेचे सहायक व्यवस्थापक अश्रूबा सुर्वे यांच्या तक्रारी वरून आ पंडित यांच्यासह 28 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री उशिरा या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

COMMENTS