अखेर राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

अखेर राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

पुणे – किल्ले शिवनेरीवर शिवसृष्टी व रोपवे, वढू तुळापूर येथे ऐतिहासिक वारसास्थळ शंभुसृष्टी निर्मिती करण्याच्या मागणीला केंद्राकडून सकारात्मक भूमिका मिळाल्याची घोषणा राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून केली आहे. काही दिवसांपूर्वीच येत्या 18 डिसेंबरला मोठी घोषणा करणार असल्याचे संकेत डॉ. अमोल कोल्हे यांनी दिले होते. त्यामुळे अमोल कोल्हे नेमकी काय घोषणा करणार याची उत्सुकता लागली होती. परंतु आज अखेर ती उत्सुकता संपली आहे.

दरम्यान खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी शिवसृष्टीची निर्मती सह रोप-वे निर्मिती करण्यात यावी तसेच वढू तुळापूर या ठिकाणी शंभूसृष्टी उभारण्यात यावी अशी आग्रही मागणी केली होती. आज त्यांच्या प्रयत्नांना माननीय प्रहलाद सिंह पटेल पर्यटन व सांस्कृतिक मंत्री भारत सरकार यांनी खासदार डॉ अमोल कोल्हे यांना लेखी पत्राद्वारे लवकरच या निर्मितीसाठी केंद्रीय समिती मार्फत सर्व्हे केला जाईल पॉलिसीनुसार त्यानंतर पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल.

लोकसभा प्रचारामध्ये खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी भक्ती-शक्ती कॅरिडॉर अंतर्गत किल्ले शिवनेरीवरती शिवसृष्टीची निर्मिती तसेच शौर्यपीठ वढू तुळपुर येथे शंभुसृष्टी निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते याच आश्वासनाची मागणी दि १० डिसेंबरच्या संसदीय भाषणात खासदार खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी शून्यप्रहारामध्ये केली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आणि तमाम शिवभक्तांचे शक्तीतीर्थ असणाऱ्या किल्ले शिवनेरी येथे आबालवृद्धांना दर्शन घेता यावे यासाठी रोपवे आणि पायथ्याशी शिवप्रभूंचा पराक्रम आणि महाराष्ट्राची लोकसंस्कृती याचे दर्शन घडवणारी “शिवसृष्टी” साठी लवकरच मार्ग निघेल.

वढू तुळापूर या ठिकाणी “शंभूसृष्टी”हे स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचा ऐतिहासिक वरसास्थळ व शौर्यपीठ म्हणुन शंभूराजे प्रेमींना ,जाजवल्या इतिहास अनुभावात येईल. तसेच भक्ती-शक्ती कॅरिडोअर निर्मितीमुळे शिरुर लोकसभा मतदारसंघात हजारो रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील व पर्यटनवृद्धी होण्यास निश्चितच फायदा होईल.

खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या अभ्यासपूर्ण मागणीस केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयाने लवकरच यासाठी प्रयत्न केले जातील असे लेखी पत्राद्वारे कळविले असुन या ऐतिहासिक कार्यास लवकरच सिध्दीस जाईल असे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी सांगितले आहे.

खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या मागणीला यश किल्ले शिवनेरीवर शिवसृष्टी व रोपवे , वढू तुळापूर येथे ऐतिहासिक वारसास्थळ…

Posted by Dr.Amol Kolhe on Tuesday, December 17, 2019

COMMENTS