राष्ट्रवादीच्या खासदाराचा ‘आँख मारे’ गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल !

राष्ट्रवादीच्या खासदाराचा ‘आँख मारे’ गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल !

भंडारा – एका महाविद्यालयीन कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या खासदारानं डान्स केला असल्याचं समोर आलं आहे.
भंडारा-गोंदिया मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मधुकर कुकडे यांनी आँख मारे’ या गाण्यावर डान्स केल असल्याचं समोर आलं आहे. कुकडे यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मधुकर कुकडे यांना ‘आँख मारे’ या गाण्यावर डान्स करताना पाहून उपस्थित विद्यार्थ्यांनीही ठेका धरला होता.

नुकताच प्रदर्शित झालेला ‘सिम्बा’ या सिनेमातील ‘आंखे मारे’ या गाण्यावर विद्यार्थी डान्स करत होते. मुले डान्स करताना पाहून खासदार महाशयांना डान्सचा मोह आवरता आला नाही. विद्यार्थी आणि खासदार यांनी मिळून आँख मारे या गाण्यावर ठेका धरला आहे. कुकडे यांना ठेका धरताना पाहून उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन दिले असल्याचं पहावयास मिळाले.

COMMENTS