मी शरद पवारांचा विश्वासू आहे, पक्ष बदलणार नाही – राष्ट्रवादी खासदार

मी शरद पवारांचा विश्वासू आहे, पक्ष बदलणार नाही – राष्ट्रवादी खासदार

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौय्रावर आहेत. यादरम्यान त्यांच्या हस्ते अनेक विकासकामांचं भूमिपूजन केलं जात आहे. मुंबईतील मेट्रो भूमिपूजनच्या कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे खासदार उपस्थिती राहिल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे जवळचे सहकारी आणि खासदार माजिद मेमन यांनी मोदी यांच्या उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यामुळे ते देखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान याबाबत मेमन यांनी प्रतिक्रिया दिली असून मी पक्ष बदलणार नाही. शरद पवारांचा मी विश्वासू सहकारी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी सोडण्याचा प्रश्नच येत नाही, असा खुलासा माजिद मेमन यांनी केला आहे. परंतु मेमन यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या असल्या तरी मेट्रो भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

COMMENTS