1 मार्चपासून राष्ट्रवादीचं मिशन मुंबई, तिन्ही पक्ष एकत्र लढणार – नवाब मलिक

1 मार्चपासून राष्ट्रवादीचं मिशन मुंबई, तिन्ही पक्ष एकत्र लढणार – नवाब मलिक

मुंबई – मुंबई महापालिका निवडणुकीतही राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित येऊन निवडणूक लढवणार असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केलं आहे. 1 मार्चपासून राष्ट्रवादीचं मिशन मुंबई महापालिका सुरू होणार असल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे. एक मार्चला एक दिवसीय अधिवेशन होणार असून अजित पवार,शरद पवार,जयंत पाटील हे या अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे.

दरम्यान या अधिवेशनानंतर मुंबई महापालिकेच्या तयारीला आम्ही लागणार आहोत. महापालिकेतील 227 वॉर्डमध्ये संघटन मजबूत करणार असून जनतेपर्यंत पक्ष पोहचवणार आहोत. तसेच मुंबई महापालिका निवडणूक तिन्ही पक्ष एकत्र लढली पाहिजे,आमचा पक्ष मजबूत झाला तर इतर पक्षांना फायदा होईल. तसेच आघाडीत आम्ही एकत्र लढू असंही मलिक यांनी म्हटलं आहे.

COMMENTS