मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी ‘यांची’ नियुक्ती !

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी ‘यांची’ नियुक्ती !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता नवाब मलिक यांची आज अखेर मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मलिक यांची नियुक्ती केली आहे.

दरम्यान नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असून राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री होते. ते चार वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत.२०१४ साली अणुशक्ती नगर या विधानसभा मतदारसंघातून अतिशय कमी मताधिक्याने त्यांचा पराभव झाला होता. अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर मलिक यांनी जोरदार टीका केली होती. ‘मुंबईत विधानसभा निवडणुकीत यश मिळणार नाही हे लक्षात आल्यावर सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्याचं अहिर यांनी म्हटलं होतं.

COMMENTS