कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही; राष्ट्रवादी नेत्याचे वक्तव्य

कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही; राष्ट्रवादी नेत्याचे वक्तव्य

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. खान यांच्या वांद्र्यातील निवासस्थानी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाने धाड टाकली. समीर खान यांच्या घरात एनसीबीकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. यावर नवाब मलिक यांनी ट्विट करून “कोणीही कायद्यापेक्षा मोठं नाही आणि कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाला ही गोष्ट लागू असावी. कायदा आपलं काम करेल आणि न्याय होईल. मी न्यायव्यवस्थेचा आदर करत असून त्यावर पूर्ण विश्वास आहे”.

ब्रिटिश नागरिक असलेला ड्रग्ज सप्लायर करण सजनानी केसमध्ये समीर खान यांना अटक झाली आहे. एनसीबीच्या सूत्रांच्या माहितीनुसार करण सजनानी आणि समीर खान या दोघांमध्ये ड्रग्जबाबत झालेले चॅट आणि पैशांच्या देवाणघेवाणीचे पुरावे सापडले आहेत. या प्रकरणी काल सकाळपासून त्यांची चौकशी सुरु होती. संध्याकाळी समीर खान यांना एनसीबीने अटक केली.

यावर भाजपचे नेते यांनी नवाब मलिक यांचे जावई आणि ‘ड्रग्जचा लॉर्ड’ समीर खान यांना एनसीबीने अटक केली आहे. आता मलिक यांनी ठाकरे सरकारमधून पायउतार व्हावे, अशी मागणी केली. त्यास प्रतित्तुर म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, जावयाच्या गुन्हाच्याची सासऱ्याला शिक्षा का असा प्रश्न उपस्थित केला आहे. जावई, सासरे असे दोन्ही कुटुंब वेगळी आहे. याप्रकरणाचे सत्य लवकरच बाहेर येईल.

COMMENTS