राष्ट्रवादीच्या निर्धार सभेकडे कल्याणकरांची पाठ, सभेतल्या अर्ध्या खुर्च्या रिकाम्या ! VIDEO

राष्ट्रवादीच्या निर्धार सभेकडे कल्याणकरांची पाठ, सभेतल्या अर्ध्या खुर्च्या रिकाम्या ! VIDEO

मुंबई – कल्याणमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार सभा पार पडली. मात्र या सभेकडे कल्याणकरांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसकडून परिवर्तनाचा निर्धार करत महाराष्ट्रभर जाहीर सभा घेतल्या जातायत. काल ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड आणि उल्हासनगरमध्ये सभा झाली, तर आज कल्याण आणि अंबरनाथला ही सभा पार पडली. कल्याण पूर्वेतल्या चक्कीनाका भागात झालेल्या या सभेला अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, धनंजय मुंडे, फौजिया खान, चित्रा वाघ, गणेश नाईक असे राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिल्या फळीतले नेते उपस्थित होते. मात्र या सभेकडे नागरिकांनीच नव्हे, तर कार्यकर्त्यांनीही पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. कारण सभेतल्या अर्ध्यापेक्षा जास्त खुर्च्या या शेवटपर्यंत रिकाम्याच होत्या. खुर्च्या भरण्यासाठी ४ वाजताची सभा ६ वाजेपर्यंत सुरू करण्यात आली नाही, मात्र पुढे दुसरी नियोजित सभा असल्यानं रिकाम्या खुर्च्यांसमोर भाषणं करण्याची वेळ राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आली होती.

COMMENTS