राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेला सुरुवात, रायगडावर सरकारविरोधात फुंकले रणशिंग !

राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेला सुरुवात, रायगडावर सरकारविरोधात फुंकले रणशिंग !

रायगड – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेचा रायगडावर शुभारंभ झाला असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन, अभिवादन करून भाजप सरकारविरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रणशिंग फुंकले आहे. यावेळी विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, जेष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसेपाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उपस्थित होते.

दरम्यान सरकारने केलेले भ्रष्टाचार, आत्तापर्यंचे घोटाळयांचे आरोप आणि दुष्काळ हाताळण्यात आलेले अपयश. तसेच चार वर्षात पेट्रोल-डिझेलची दरवाढ करुन केलेली लूट. अनेक प्रश्न घेवून राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील जनतेपर्यंत ‘निर्धार परिवर्तनाचा’ हे ब्रीदवाक्य घेवून परिवर्तन संपर्क यात्रा काढली आहे.यावेळी सरकारविरोधात राष्टेरवादीच्या नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली.

यात्रेचं आजचं वेळापत्रक

गुरुवार दि 10 जानेवारी 2019

सकाळी 9 वाजता – रायगड किल्ला

स. 11 वाजता – चवदार तळे महाड

सायं – 6 वाजता – गुहागर

COMMENTS