राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर मुंबई पोलिसांकडून ड्रोनद्वारे नजर ! VIDEO

राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर मुंबई पोलिसांकडून ड्रोनद्वारे नजर ! VIDEO

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर मुंबई पोलिसांकडून ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्यापासून राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. शरद पवार यांच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी सरकारचा निषेध केला जात आहे. तसेच आज दोन वाजता शरद पवार स्वत: ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांची कडक सुरक्षा व्यवस्था पहावयास मिळत आहे. राष्ट्रवादी कार्यालयाबाहेरही पोलिसांकडून ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे.

दरम्यान शरद पवारांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचं आवाहन केलं आहे.  मात्र राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पवारांचा हा आदेश अमान्य असल्याचं म्हटलं आहे. माफ करा साहेब यावेळेस पहिल्यांदा आम्ही तुमचे ऐकणार नाही, तुमच्या महाराष्ट्र घडवतानाच्या वेदना आम्ही बघितल्या आहेत. कर्करोग, मांडीच्या हाडाचे ऑपरेशन, पायाला झालेली इजा, तरी तुम्ही लढताय, वय वर्ष 79, हे सगळे तुम्ही आमच्यासाठी सोसलंय आहे, आम्हाला उद्यासाठी माफ करा, असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

COMMENTS