पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचं जोरदार प्रत्युत्तर!

पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचं जोरदार प्रत्युत्तर!

सातारा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साताय्रातील सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. साताऱ्यात पेढेवाला मोदी येऊ द्या नाहीतर आणखी दुसरा कुणी मोदी येऊ द्या. इथे फक्त पवारसाहेबांची हवा आहे. असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच कोरेगावचा आमदार असताना मी अनेक विकासकामे केली आहेत. गोरगरिबांची अनेक कामं मी मार्गी लावली आहेत. विरोधकांना सभेसाठी माणसंदेखील मिळत नाहीत. म्हणून ते सभाच घेत नाही, असं म्हणत त्यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींची गुरूवारी साताऱ्यात उदयनराजे भोसले आणि विधानसभेच्या भाजप उमेदवारांसाठी प्रचारसभा पार पडली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. सातारा जर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे तर उदयनराजेंच्याविरोधात शरद पवार का उभे राहिले नाहीत?, पवारांना हवेचा अंदाज कळतो असं मोदींनी म्हटलं होतं. यावर शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं असून मोदीजी तुम्ही साताऱ्यातून उभे रहा पवारसाहेब तुमच्या विरोधात उभे राहून इतिहास घडवतील, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS