राधाकृष्ण विखे पाटलांना राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर!

राधाकृष्ण विखे पाटलांना राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर!

मुंबई – काँग्रसचे नेते राधाकृष्ण विखे पाटलांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवारांबद्दल नाराजी व्यक्त केली. बाळासाहेब विखेंसोबत झालेला जुना वाद हा वैचारिकच होता. मात्र, सध्याचे वाद वैयक्तिक पातळीवर येतात. त्यावेळी राजीव गांधींनी बाळासाहेब विखेंना पाडा, असा आदेश दिला होता. ती जबाबदारी केवळ काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून शरद पवारांनी पाळली होती. तसेच राधाकृष्ण विखे पाटलांनी आघाडी धर्माबाबत केलेल्या वक्तव्याचाही आव्हाडांनी समाचार घेतला असून ज्यांच्या चिरंजीवांनी आघाडी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला त्यांनी आघाडीबाबत बोलू नये, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

विखे पाटलांचं वक्तव्य

पवारांनी आमचे वडील बाळासाहेब विखे यांच्याबद्दल केल़लं विधान बरोबर नव्हतं. आपण आघाडीचा धर्म पाळतो ते आज हयात नाहीत आ़णि त्यांच्याबद्दल एवढ्या ज्येष्ठ नेत्याने असं वक्तव्य करणं चुकीचं होतं.
तोपर्यंत सुजयचा निर्णय झाला नव्हता. जागावाटपाच्या चर्चेत माझ्या मुलाने वेगळ्या पक्षात जावं याची चर्चा माझ्याबरोबर झाली नव्हती. जागांची अदलाबदल करण्याची चर्चा सुरू होती. मात्र पवारांचे ते विधान आले त्यानंतर आपल्या आजोबाबाबत केलेल्या विधानामुळे सुजयने तो निर्णय घेतला असावा असंही विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

त्यावर आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं असून ज्यांच्या चिरंजीवांनी आघाडी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला त्यांनी आघाडीबाबत बोलू नये, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

COMMENTS