राष्ट्रवादीचा एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न, शिवसेनेला पाठिंबा देण्याचे संकेत!

राष्ट्रवादीचा एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न, शिवसेनेला पाठिंबा देण्याचे संकेत!

मुंबई – विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपा आणि शिवसेना युतीला बहुमत देऊन सरकार स्थापनेची संधी दिली आहे. परंतु दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करण्यात अडकले आहेत. मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरु झाली आहे. शिवसेना-भाजपमधील आजची बैठकही रद्द करण्यात आली आहे. अशातच या वादात आता राष्ट्रवादीने उडी घेतली आहे. राज्यात सरकार पडल्यास वेळप्रसंगी शिवसेनेला पाठिंबा दिला जाईल, असे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे.त्यामुळे एकप्रकारे भाजपला इशारा देते राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली असल्याचे दिसत आहे.

दरम्यान शिवसेनेने 50-50 चा फॉर्म्युला सांगत सत्तेत निम्मा वाटा मागितला आहे. त्यामुळे शिवसेना अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदावर अडकली आहे, तर भाजप त्यावर कोणतीही तडजोड करण्यास तयार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरलाच नव्हता, असा दावा केला आहे.
आम्ही सरकार लवकरच स्थापन करू आणि स्थिर सरकार देऊ, भाजप नेतृत्वातच सरकार स्थान होईल,शपतविधीचा मुहूर्त अजून काढायचा आहे मी 5 वर्षे मुख्यमंत्री पदावर राहीन यामध्ये मला कोणतीही शंका नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना त्यांचाच व्हिडीओ दाखवत फॉर्म्युलाची आठवण करुन दिली आहे. या व्हिडीओमध्ये ‘सत्ता, पद आणि जबाबदाऱ्यांचे समान वाटप होईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्वतः म्हटलं असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरुन आता दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. शिवसेना भाजपच्या याच वादात आता राष्ट्रवादीनं उडी घेतली आहे. राज्यात सरकार पडल्यास वेळप्रसंगी शिवसेनेला पाठिंबा दिला जाईल, असे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे.त्यामुळे एकप्रकारे भाजपला इशारा देत राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली असल्याचे दिसत आहे.

COMMENTS