राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत राजीनामा सत्र, तारिक अन्वर यांच्यानंतर आणखी एका नेत्याचा राजीनामा !

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत राजीनामा सत्र, तारिक अन्वर यांच्यानंतर आणखी एका नेत्याचा राजीनामा !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत राजीनामा सत्र सुरु झालं असल्याचं दिसत असून ज्येष्ठ नेते तारिक अन्वर यांच्यानंतर आणखी एका नेत्यानं पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस हकीम मुनाफ यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसला असल्याचं दिसत आहे.

हकीम मुनाफ

दरम्यान हकीम मुनाफ हे तारिक अन्वर यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे हकीम मुनाफ यांनी तारिक अन्वर यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडचिठ्ठी दिली असल्याची माहिती आहे. दरम्यान तारिक अन्वर यांच्या राजीनाम्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे हकीम मुनाफ देखील काँग्रेसमध्ये जातील का असा सवाल आता राजकीय वर्तुळात केला जात आहे.

COMMENTS